आजकालवेगळेच वातावरण अनुभवायला येते. पावसाळ्यात सुध्दा उकाडा जाणवतो. थंडीच्या दिवसात तर कडाक्याची थंडी केव्हा आली? केव्हा येणार? याची स्मृती जागवावी लागते. उन्हाळा हा बारमाही बाराखडीसारखा असतो. घाम आणि तहान ही तर नित्याचीच चिंता मानवी जीवनाला त्रस्त करीत असते, सतावीत असते, व्याकूळ करीत असते’’ (घामाला अपवाद अर्थात् वातानुकूल बंदिस्ती!) असे सूर, असे व्यथित सूर, असे प्रतिकूलतेचा कंठशोष करणारे सूर जीवन व्यथित करतात. कोणते बरे कारण असेल या व्याकूळतेला? मानवनिर्मित कृतघ्नतेला? जीवनाचे विधायक गणित हे परिश्रमाच्या बेरजेवर, दुष्टपणाच्या शुन्यातील वजाबाकीवर, संपन्नतेच्या गुणाकारावर आणि संकुचित वृत्तीच्या भागाकारावर अवलंबून असते. गणितातील जर ‘कॅलक्युरेटर’ कसाही हाताळला गेला तर, ‘अचूक उत्तराची’ अपेक्षा कशी बरे करावी?
सजीवांचे रक्षण
देई पर्यावरणाला संरक्षण
वनराईचे रक्षण
देई पर्यावरणाला संरक्षण
पाण्याच्या संचयाचे रक्षण
देई पर्यावरणाला संरक्षण
नैसर्गिक संपत्तीचे रक्षण
देई पर्यावरणाला संरक्षण
आपले पर्यावरण कशावर निर्भर आहे? निसर्ग नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यावर! मनुष्य ही परमेश्वराची सर्वश्रेष्ठ निर्मिती आहे. योग्य-अयोग्य याचा विचार करण्याची क्षमता, खरं म्हणजे पूर्ण क्षमता, मनुष्याच्या ठिकाणी असते. संवर्धन की संहार यावरच पर्यावरणाचे संरक्षण अधोरेखित झालेले असते. मनुष्याची सहिष्णू वृत्ती, स्वार्थाची चढती भाजणी अन् कनवाळूपणाची उतरती भाजणी यातून पर्यावरणाचे जतन कसे बरे होईल?
जतन करा, जतन करा
निसर्गाची हिरवी शाल जतन करा
जतन करा, जतन करा
अक्षय धनाचे जतन करा
जतन करा, जतन करा
समृद्धीचा संचय जतन
या काव्यांशाचा मतितार्थ लक्षात ठेवणे पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वाचे ठरते. पर्यावरण संरक्षण कसे शक्य आहे? वृक्षतोड, जंगलांची सफाई, बेसुमार खनिज संपत्तीची लुट, कॉंक्रीटची तापदायक जंगले यावर जर अंकुश लावला तरच पर्यावरणाचे संरक्षण शक्य आहे. खरं म्हणजे ती काळाची गरज आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा या मनुष्याच्या मुलभूत गरजांना प्राधान्य देणारे, अग्रक्रम देणारे, भूषण ठरणारी मानवी वृत्ती पर्यावरणाला पूरक ठरणारी असते, प्रेरक ठरणारी असते, प्रेरणावर्धक ठरणारी असते. ‘निसर्गाचे संतुलन सान्निध्य’ ज्यावेळी बिघडते, तापदायक ठरते, त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडतो. याला कोण कारणीभूत?
आजकाल सर्व प्रकारची माध्यमे, पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे त्याबद्धल आपली मते आग्रहाने मांडीत असतात. विविध संघटना, पर्यावरणप्रेमी, पर्यावरणाला अनुकूल आणि हितदायक गोष्टींचा भावनिक आग्रह धरतात. मग तो आग्रह वृक्षसंवर्धनाचा असो, अनावश्यक वृक्षतोडीला पायबंद आणि प्रतिबंध करणारा ‘हट्टाग्रह अन् हक्काग्रह’ असो, डोंगरपठाराचे रूपांतर बिनशेतीत करण्याचा ‘सत्ताग्रहा’ला विरोध असो, केरकचर्याचे वैज्ञानिकदृष्ट्या आरोग्यवर्धक नियोजन असो, अनिर्बंध पाण्याचा अपव्यय असो, हवा प्रदुषणाची वाढती व्याप्ती असो! या प्रकारच्या सार्याच ‘सामाजिक समस्याच’ निकोप समाज व्यवस्थेला घातक ठरतात, दुषणावह ठरतात, तापदायक ठरतात, असं नाही कां आपल्याला वाटत?
हिरवेगार माळरान, हिरवी शाल पांघरलेली आपली मायभूमी, स्वच्छ जलाशये, मग त्या विहिरी असोत, तलाव वा नद्या असोत, पर्यावरणाला बाधक न ठरणारे खोदकाम असो, बांधकाम असो, याचा पुरस्कार ज्यावेळी समाजात होत असतो, त्यावेळी पर्यावरणाचे संतुलन अस्थिर, अस्वस्थ होत असते. याबद्धल कुणाचेही दुमत असू शकत नाही.
‘मनुष्याची कृतघ्नता’ मग ती विषम विचारांची असो, अवाजवी कृत्यांची असो, नैसर्गिक तत्त्वांना बाधा आणणारी असो, योग्य नियंत्रण न ठेवणारी आणि परिणाम म्हणून वेदनांना निमंत्रण देणारी वृत्ती असो-परिणाम ठरलेला- नाश! हे तत्व पर्यावरणालाही लागू पडणारे आहे. जलसाठ्याचा दुरूपयोग करून चालेल का? जंगलसंपत्तीचा जर विध्वंस केला तर पर्यावरणाचे संरक्षण कसे बरं करता येईल? खनिज उत्खनन निसर्ग नियमांचे उल्लंघन करून केले तर, पर्यावरणावर दुष्परिणाम ठरलेलाच असतो. विषारी द्रव्याची योग्य विल्हेवाट लावली, प्रदुषणमुक्त कारखान्यांना प्रोत्साहन देण्याची वृत्ती, प्लास्टीकचा अल्प उपयोग अन् योग्य पर्यावरणपूरक नियंत्रण, कमी हवा प्रदुषण करणारी वाहने, झाडांची लागवड अन् योग्य निगा, पर्यावरणाला विशेष बाधा न आणणार्या कृत्रिम अडथळ्यांना प्रतिबंध, सौरशक्तीचा अधिकाधिक उपयोग इत्यादींकडे ज्यावेळी डोळस वृत्ती, अनुकूल वृत्ती दिसेल तीच काळाची गरज आहे. अन्यथा कोणते भीषण चित्र भविष्यात समाजात दिसेल याचा उहापोह करणारी या काव्यपंक्तीः-
कॉंक्रिटची जंगले
ठरतील संहारक पाऊले
प्लास्टिकचा उपद्व्याप
देईल जनांना संताप
बेसुमार वृक्षतोड
देईल संहाराला जोड
विषारी द्रव्याचा ताप
होईल भितीचा बाप
अशाने होईल प्रदुषण
करील मानवांचे शोषण
हे जर टाळायचे असेल तर-
निसर्ग नियमांचे पालन करूया,
वृक्षवेलींचे संवर्धन करूया,
भयमुक्त, संहारमुक्त जीवन जगूया,
अन् पर्यावरणाचे रक्षण करूया.
वन्य प्राण्यांच्या सौरक्षण प्रकल्प ....प्रस्तावना,कार्याची उद्दिष्टे, कार्यपद्धती, निरीक्षणे,विश्लेषण, निष्कर्ष हे patva sir