Tennis खेळाचे Niyam MaRaathi टेनिस खेळाचे नियम मराठी

टेनिस खेळाचे नियम मराठी



Pradeep Chawla on 29-10-2018


रबरी चेंडू व तातीने विणलेल्या रॅकेटने खेळावयाचा एक मैदानी खेळ. विसाव्या शतकात या खेळाचा सर्वत्र प्रसार झाला. हा खेळ सुटसुटीत, थोडक्या जागेत, थोडक्या वेळात, दोन किंवा चार खेळाडूंनी खेळणे शक्य असल्यामुळे तो जगातील सर्व देशांत व बहुधा सर्व ऋतूंत खेळला जातो. यूरोपीय देश, अमेरिका, ऑस्ट्रेलिया इ. देशांतल्या स्त्रियाही उत्तम टेनिसपटू म्हणून प्रसिद्ध आहेत. या खेळाचे आंतरराष्ट्रीय पातळीवर डेव्हिस कपचे सामने आणि जागतिक पातळीवर इंग्लंडमध्ये विंबल्डन येथे सामने होतात व अमेरिका, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया या देशांत होणारे राष्ट्रीय पातळीवर सामने जागतिक महत्त्वाचे मानण्यात येतात.


टेनिसचा चेंडू हा रबराचा, आत ठराविक हवेचा दाब असलेला, पृष्ठभागावर पांढरी लोकरीची फ्लॅनेल (तंतू वर असलेले कापड) लावलेला, 21/2 ते 25/8 इंच व्यासाचा (सु. 6·35 सेंमी.) आणि 2 ते 21/16 औंस (56 ते 58 ग्रॅम) वजनाचा असतो. त्याची उशी (बाउन्स) तो 100 इंच (2·50 मी.) उंचीवरून जमिनीवर टाकला असता 53 ते 58 इंच (1·28 ते 1·41 मी.) असावी लागते. टेनिसची रॅकेट ही वेताची, लाकडाची अगर धातूची बनविलेली असते. तिची लांबी 27 इंच (68·58 सेंमी.) व वजन 12 औंसापासून 14 औंसापर्यंत (336 ग्रॅम ते 392 ग्रॅम) खेळाडूच्या आवडीनिवडीप्रमाणे असते. रॅकेटचे डोके अंडाकृती असून त्याची लांबी 12 इंच (30·48 सेंमी.) व रुंदी 10 इंच (25·40 सेंमी.) असते. ते सामान्यतः तातीने, क्वचित प्लॅस्टिकच्या धाग्याने किंवा धातूच्या तारेने विणलेले असते. रॅकेटचा दांडा (हँडल) सु. 15 इंच (38·10 सेंमी.) लांब असून त्याची मूठ कातडी अगर रबरी पट्ट्याने बांधलेली असते. त्यामुळे ती पकडण्यास सुटसुटीत असते. टेनिसच्या खेळाचे मैदान 78 फूट (23·76 मी.) लांब व 36 फूट (10·96 मी.) रुंद, लांबट चौकोनी असते. त्याच्या आतील दोन्ही बाजूंस 41/2 फूट (1·36 मी.) रुंदीचे समांतर पट्टे असतात. त्यांना बाजूपट्टे (लॉबी) म्हणतात. दुहेरी खेळात त्यांना मैदानाचा भाग म्हणून मानण्यात येते. मैदानाच्या मध्यभागी रुंद विणीचे जाळे असते. ते मैदानाबाहेर रोवलेल्या दोन खांबांवरून ताणून जमिनीपर्यंत लोंबकळत असते. त्याची उंची मध्यभागी 3 फूट (91·4 सेंमी.) व खांबालगत 31/2 फूट (1·06 मी.) असते. ते हलू नये म्हणून मध्यभागी रुंद नवारीने जमिनीत पुरलेल्या आकडीत अडकविलेले असते. या जाळ्यापासून दोन्ही बाजूंस 21 फूट (6·39 मी.) अंतरावर जाळ्यास समांतर अशा दोन आरंभखेळी रेषा (सर्व्हिस लाइन्स) प्रत्येकी 27 फूट (8·45 मी.) लांब, एका आतील बाजूपट्ट्यापासून दुसऱ्‍या आतील बाजूपट्ट्यापर्यंत आखलेल्या असतात. या दोन्ही आरंभखेळी रेषांचा मध्य सांधणारी 131/2 फूटांवर (4·10 मी.) रेषा असते. या रेषेच्या योगाने दोन आरंभखेळी रेषांमधील टेनिसचे मैदान दोन समान भागांत विभागले जाते. तसेच जाळ्यापासून 36 फुटांवर असलेल्या दोन्ही पायारेषांवर (बेस लाइन्स) मध्य दाखविणारी 4 इंच (10·16 सेंमी.) लांबीची मैदानाची डावीउजवी बाजू दाखविणारी खूण-रेषा असते. टेनिस मैदान मुद्दाम राखून कापून तयार केलेल्या हिरवळीचे (लॉन) किंवा सिमेंट, ॲस्फाल्ट, चिकणमाती (क्ले) वा खडी-मुरूम-वाळू यांनी सपाट व कठीण (हार्ड) बनविलेले असते. त्यावर वरील सर्व रेषा 2 इंच (5·08 सेंमी.) रुंदीच्या खडू-चुन्याने आखलेल्या असतात. एकेरी (सिंगल्स) खेळात 27 फूट X 78 फुटांचे मैदान व दुहेरी खेळात 36 फूट X 78 फुटांचे (बाजूच्या दोन्ही पट्ट्यांसह) मैदान वापरतात. या खेळात खेळाडू सामान्यतः पांढरा टी-शर्ट, पांढरी अर्धी चड्डी, पायात पांढरे मोजे व सपाट रबरी तळ असलेले कॅन्‌व्हॉसचे पांढरे बूट वापरतात.

खेळाचे स्वरूप

हा खेळ एकेरी वा दुहेरी स्वरूपाचा असतो. प्रत्येक संघात दोन खेळाडू घेऊन दुहेरी सामना खेळता येतो किंवा प्रत्येक संघात एकच खेळाडू असल्यास एकेरी सामना खेळतात. सामन्याची सुरुवात रॅकेटच्या साहाय्याने ओलीसुकी करून होते. ती जिंकणारा संघ आरंभखेळी (सर्व्हिस) किंवा प्रांगणाची बाजू यांपैकी एकाची निवड करतो. आरंभखेळी करणारा खेळाडू आपल्या बाजूच्या उजव्या भागाकडून पायारेषेच्या पलीकडे दोन चेंडू हातात घेऊन उभा राहतो आणि त्यांपैकी एक चेंडू वर फेकून रॅकेटने प्रांगणाच्या कर्णाच्या दिशेने, प्रतिस्पर्धी संघाची आरंभखेळी रेषा आणि जाळे यांमधील भागात पहिला टप्पा पडेल अशा बेताने मारतो. जर चेंडू त्याबाहेर पडला अगर जाळ्याला अडला, तर ती सदोष खेळी (फॉल्ट) होते; तसेच चेंडू मारण्याआधी पायारेषा ओलांडल्यास वा स्पर्शल्यास सदोष खेळी समजतात. जाळ्याला लागून चेंडू पलीकडे बरोबर पडल्यास त्या खेळीची पुन्हा संधी मिळते. पहिली सदोष खेळी झाल्यास, दुसऱ्‍या चेंडूचा उपयोग करुन पुन्हा आरंभखेळीची संधी मिळते. दोन्ही सदोषखेळ्या (डबल फॉल्ट) झाल्यास प्रतिस्पर्धी संघास एक गुण मिळतो. आरंभखेळी बरोबर पडल्यास प्रतिस्पर्धी खेळाडूने पहिला टप्पा पडल्यानंतर चेंडू जाळ्यावरून पलीकडे टोलवायचा असतो. अशा आळीपाळीने चालणाऱ्‍या टोलेबाजीत ज्याचा टोला हुकेल किंवा प्रांगणाबाहेर जाईल किंवा जाळ्यात अडेल, त्याच्या विरुद्ध संघास एक गुण मिळतो. कोणत्याही संघास गुण मिळाल्यानंतर आरंभखेळी डाव्या बाजूने व नंतर उजव्या बाजूने असे डाव (गेम) होईपर्यंत चालते. एका संघास कमीत कमी दोन गुणांचा फरक ठेऊन चार गुण मिळाले, तर त्या संघाने डाव जिंकला असे मानतात. जर तीन-तीन असे गुण झाले, तर त्यास ‘ड्यूस’ म्हणतात. त्यानंतर मात्र सलग दोन गुण घेणाऱ्‍यासच ‘डाव’ मिळतो. तोपावेतो ड्यूस पुन्हा पुन्हा मोजून आरंभखेळी चालू राहते. टेनिसचे गुण मोजताना 0 ला लव्ह, 1 ला 15, 2 ला 30 आणि 3 गुणांना 40 असे मोजण्याची प्रथा आहे. एक डाव पूर्ण झाल्यानंतर प्रतिस्पर्धी संघाला आरंभखेळी करायची संधी मिळते. अशा प्रकारे आलटून-पालटून डाव खेळले जाऊन कमीत कमी दोन डावांचा फरक ठेवून सहा डाव प्रथम मिळविणाऱ्‍या संघाचा संच (सेट) होतो. असे तीनांपैकी दोन किंवा पाचांपैकी तीन संच जिकणारा संघ सामन्यात विजेता ठरतो. डावसंख्या 4-4 झाल्यास पूर्वी दोन डावांचा फरक राहीपर्यंत संच लढविला जात असे; पण सामना दीर्घ काळ चालून कंटाळवाणा होऊ नये, म्हणून आता बदल करण्यात आला आहे, तो असा : डावसंख्या 8-8 झाल्यावर 12 गुणांचा पेच-उकल निर्णय (टाय ब्रेकर) असतो व ज्या संघाचे सात गुण प्रथम होतील, त्याच्या बाजूने तो होतो.

टेनिसमध्ये टोल्यांचे पुढील प्रकार रूढ आहेत

चेंडू जमिनीवर पडण्यापूर्वी वरच्या वर हवेत मारलेला टप्पापूर्व टोला (व्हॉली), जमिनीवर टप्पा पडतो न पडतो तोच मारलेला अर्धटप्पा टोला (हाफ व्हॉली), जमिनीवर चेंडूचा टप्पा पडून एक उशी घेतल्यानंतर मारलेला पूरोहस्त (फोरहँड) व पार्श्वहस्त (बॅकहँड) टोला, डोक्यावर रॅकेट आणून मारलेला जोरदार फटका (स्मॅश) इत्यादी.

ऐतिहासिक आढावा

टेनिसच्या खेळाचे मूळ ईजिप्त व इराण या देशांत इ. स. पू. 500 च्या दरम्यान खेळल्या जाणाऱ्‍या एका चेंडूच्या खेळात सापडते. ग्रीक आणि रोमन काळांतही अशा प्रकारचा एक खेळ खेळत असत. त्याला ‘रॉयल टेनिस’ म्हणत. त्यानंतर राजे लोकांनी तो आपल्या राजवाड्यांच्या प्रांगणात नेला. तेव्हापासून त्याला ‘कोर्ट-टेनिस’ म्हणत. आधुनिक टेनिसचा खेळ किंवा ‘लॉन-टेनिस’ हा गेल्या शतकात, 1874 मध्ये मेजर वॉल्टर सी. विंगफील्ड याने शोधून काढला व तो लवकरच लोकप्रिय झाला. 1875 मध्ये ‘मेरिलीबोन क्रिकेट क्लब’ने या खेळाचे प्रथम नियम तयार केले व तेव्हापासून या खेळाची खरी प्रगती होत गेली. 1877 मध्ये या खेळाच्या पहिल्या स्पर्धा सुरू झाल्या. त्या लंडनच्या विंबल्डन या उपनगरात भरल्या होत्या. 1888 मध्ये इंग्लंडमध्ये ‘लॉन टेनिस असोसिएशन’ ही संस्था स्थापन करण्यात आली. या संस्थेमार्फतच हल्ली या खेळावर नियंत्रण चालते. त्यानंतर अमेरिका व ऑस्ट्रेलिया या खंडांत हा खेळ सुरू झाला. तेथे त्याच्या संस्था स्थापन झाल्या. पुढे 1912 साली इंग्लंडमध्ये ‘इंटरनॅशनल लॉन टेनिस असोसिएशन’ ची स्थापना झाली व तिच्यामार्फत या खेळात जागतिक नियंत्रण आणि संलग्नपणा आला. या संस्थेने केलेले नियम आता जगभर प्रमाणभूत मानतात.

    महत्त्वाच्या टेनिस स्पर्धा पुढीलप्रमाणे आहेत
  • विंबल्डन ओपन टेनिस स्पर्धा
  • यात 1968 पूर्वी फक्त हौशी खेळाडूंनाच भाग घेता येत असे. आता त्या हौशी व धंदेवाईक खेळाडूंना खुल्या झाल्या आहेत. यात पुरुषांच्या एकेरी व दुहेरी, स्त्रियांच्या एकेरी व दुहेरी आणि स्त्री-पुरुषांच्या मिश्र स्पर्धा असतात. जगातील बहुसंख्य राष्ट्रांचे हौशी व धंदेवाईक खेळाडू या स्पर्धांना अत्यंत महत्त्व देतात; कारण त्यांतील विजयावर त्यांना व त्यांच्या राष्ट्राला जागतिक बहुमान मिळतो. त्यात जगातील विविध राष्ट्रांतील नामवंत खेळाडू भाग घेत असल्यामुळे खेळाचा दर्जाही उच्च असतो. वरील पाच प्रकारच्या स्पर्धांशिवाय 1949 पासून उत्तेजनार्थ मुलांच्या एकेरी व मुलींच्या एकेरी स्पर्धा सुरू करण्यात आल्या आहेत. भारताच्या कृष्णनने 1954 मध्ये मुलांच्या स्पर्धांत अजिंक्यपद मिळविले होते.

  • डेव्हिस कप स्पर्धा
  • टेनिस हा जरी वैयक्तिक खेळ असला, तरी त्याला सांघिक स्वरूप देता येते व हे कार्य अमेरिकेच्या डी. एम्. डेव्हिस या नामवंत खेळाडूने केले. त्याने आपल्या नावाचा एक चषक बहाल करून 1900 सालापासून राष्ट्राराष्ट्रांमध्ये जागतिक अजिंक्यपदासाठी पहिले सामने घडवून आणले. ते सामने मोठ्या चुरशीने चालू आहेत. पहिल्या वर्षीचे सामने अमेरिकेने जिंकले (1900). या सामन्यांत अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड व फ्रान्स यांचाच वरचष्मा दिसतो. अमेरिकेने डेव्हिस कप 23 वेळा, ऑस्ट्रेलियाने 20 वेळा, इंग्लंडने 12 वेळा व फ्रान्सने 7 वेळा जिंकलेला आहे. या स्पर्धांत 1974 साली भारताचा संघ रशियासारख्या प्रबळ संघाचा पराभव करून निर्णायक फेरीपर्यंत येऊन पोहोचला होता. या स्पर्धा फक्त पुरुषांसाठीच आहेत.


    डेव्हिस कप स्पर्धांत भाग घेणाऱ्‍या प्रत्येक राष्ट्रास एकेरी लढतीसाठी दोन खेळाडू व दुहेरीसाठी दोन खेळाडू, असा 4 खेळाडूंचा संघ नोंदवावा लागतो. एका राष्ट्राच्या दोन खेळाडूंना विरुद्ध राष्ट्राच्या दोन खेळाडूंशी स्वतंत्रपणे उलटसुलट असे एकूण चार एकेरी सामने खेळावयाचे असतात. एका राष्ट्राची जोडी विरुद्ध दुसऱ्‍या राष्ट्राची जोडी असा एकच दुहेरी सामना असतो. एकेरी व दुहेरी मिळून एकूण 5 सामने खेळावयाचे असतात. या पाचांपैकी कोणतेही तीन सामने जिंकणारा संघ विजेता ठरतो.


    या स्पर्धांत सोयीसाठी चार विभाग पाडलेले आहेत : (1) अमेरिका-विभाग, (2) यूरोप किंवा पाश्चिमात्य-विभाग, (3) पूर्व-विभाग व (4) द. अमेरिका-विभाग. त्या त्या विभागात बाद-पद्धतीने सामने होतात. या चारी विभागांतील विजेती राष्ट्रे उपांत्य व अंतिम सामने खेळून त्यांत जे राष्ट्र विजयी होईल, त्याला गतवर्षीच्या विजयी राष्ट्राशी आव्हान-सामना खेळावा लागत असे; पण ती पद्धत बंद करण्यात आली आहे.आदल्या वर्षीच्या विजयी राष्ट्राला आपल्या विभागात इतरांप्रमाणेच सामने खेळावे लागतात.

  • वीटमन कप स्पर्धा
  • या स्पर्धा 1923 पासून खास स्त्रियांच्या साठीच आयोजित केल्या आहेत. या स्पर्धांत फक्त इंग्लंड व अमेरिका यांतील स्त्री खेळाडू भाग घेतात. यात 5 निवडक खेळाडूंचा संघ नोंदवितात व त्यांच्यात 5 एकेरी व 2 दुहेरी असे एकूण सात सामने होतात. त्यांतील 4 सामने जिंकणारा संघ विजयी ठरतो. आतापर्यंत अमेरिकेने 30 वेळा आणि इंग्लंडने 7 वेळा हा कप जिंकला आहे.

  • अमेरिकेच्या खुल्या टेनिस स्पर्धा
  • या स्पर्धा दरसाल विंबल्डनच्या स्पर्धांनंतर न्यूयॉर्कजवळील फॉरेस्ट हिल्स येथे भरतात. विंबल्डनला आलेले जगातील प्रमुख खेळाडू यांत भाग घेतात; कारण त्या विंबल्डनच्या खालोखाल महत्त्वाच्या मानल्या जातात.

  • इतर स्पर्धा
  • अमेरिकेच्या खुल्या टेनिस स्पर्धांप्रमाणेच ऑस्ट्रेलिया, फ्रान्स व इटलीमधील टेनिस स्पर्धाही महत्त्वाच्या मानतात. विंबल्डन, अमेरिकन, ऑस्ट्रेलियन व फ्रेंच टेनिस स्पर्धा सलगपणे एकाच वर्षी जिंकणाऱ्‍या खेळाडूने टेनिसमध्ये ‘ग्रँड स्लॅम’ मिळविली, असे मानतात. तो एक जागतिक वैयक्तिक बहुमान असतो. 1938 साली अमेरिकेचा डॉन बज, 1953 साली अमेरिकेची स्त्री खेळाडू मॉरीन कॉनोली व 1962 साली ऑस्ट्रेलियाचा रॉड लेव्हर यांनी हा बहुमान मिळविला आहे. दुहेरी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या फ्रँक सेजमन व केन मॅक्रॅगॉर या जोडीने 1951 मध्ये हा मान मिळविला.

    भारतीय टेनिस

    ब्रिटिश अमदानीत टेनिसचा खेळ भारतात आला. हा खेळ खर्चाचा असल्यामुळे सामान्य लोकांपर्यंत जाऊ शकला नाही. उच्च सधन वर्गातील लोक, महाविद्यालयीन विद्यार्थी इ. हा खेळ खेळतात. भारतात या खेळाचे नियंत्रण करणारी संस्था ‘ऑल इंडिया लॉन टेनिस असोसिएशन’ ही असून तिला राज्यांतील संस्था संलग्न आहेत. भारतात राज्यपातळीवर तसेच पूर्व, पश्चिम, दक्षिण, मध्य, उत्तर अशा विभागीय पातळ्यांवर व अखिल भारतीय पातळीवर टेनिसच्या खुल्या स्पर्धा भरत असतात. त्यांत भारतातील प्रमुख खेळाडू व काही विदेशी आमंत्रित खेळाडू भाग घेतात. आशियाई खुल्या स्पर्धा व डेव्हिस कप स्पर्धाही अधूनमधून भारतात घेण्यात येतात.


    भारतात जुन्या जमान्यात म्हणजे साधारणतः 1925–40 या काळात गौस महंमद, युधिष्ठिरसिंग, नरेशकुमार, बॉबजी, सवूर, सुमंत मिश्रा, जिमी मेहता हे प्रसिद्ध खेळाडू होते. सध्या रामनाथन् कृष्णन, जयदीप मुकर्जी, प्रेमजीतलाल, एस्. मिश्रा, विजय आणि आनंद अमृतराज असे नामवंत खेळाडू आहेत. त्यांपैकी कृष्णन आणि विजय अमृतराज या दोघांनी विंबल्डनच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याची बहुमोल कामगिरी केली आहे.

    जगप्रसिद्ध खेळाडू

    1920 पासूनच्या गेल्या 50 वर्षांत अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स इ. देशांत बरेच नामवंत खेळाडू झाले. त्यांत बिल टिल्डेन, डॉन बज, बॉबी रिग्ज, जॅक क्रॅमर, पँको गाँझॅल्स, चक मॅकिन्ले, बज पॅटी, जी. मुलॉय इ. अमेरिकेचे पुरूष खेळाडू आणि ए. एल्. ब्रो, मॉरीन कॉनोली, ए. गिब्सन, शर्ले फ्राय, बिली जीन किंग इ. स्त्री खेळाडू प्रसिद्ध आहेत. इंग्लंडचे फ्रेड पेरी, बनी ऑस्टिन, ए. जे. मोट्रॅम इ. पुरुष खेळाडू व ॲन हॅडॉन जोन्स, सी. ट्रूमन, अँजेला मॉर्टिमर इ. स्त्री खेळाडू विशेष उल्लेखनीय होत. ऑस्ट्रेलियात जी. पॅटरसन, फ्रँक सेजमन, ल्यू होड, केन रोजवॉल, रॉड लेव्हर, ए. कूपर, जॉन न्यूकोंब, नील फ्रेझर, रॉय एमर्सन इ. पुरुष खेळाडू व बी. एच्. मोल्सवर्थ, नॅन्सी बोल्टन व मार्गारेट कोर्ट इ. नामवंत स्त्री खेळाडू आहेत. फ्रान्समध्ये हेन्री कॉशे, जे. बोरोट्रा, व्हान पेट्रा हे पुरुष खेळाडू व सुझान लँग्लेन ही स्त्री खेळाडू प्रसिद्ध आहे. यांशिवाय जर्मनीचे व्हॉन क्रॅम, बंगर्ट, कुन्के, स्पेनचा मॅन्युएल सांताना, ब्राझीलचा ऑल्मेडो, द. आफ्रिकेचा क्लिफ ड्रिस्डेल, एक्वादोरचा पी. सेग्युरा, भारताचा कृष्णन, जपानचा वतानबे, फिलिपीन्सचा अॅम्पॉन, रशियाचा मेत्रेव्हिली हे जागतिक दर्जाचे खेळाडू समजले जातात. 1975 च्या आगेमागे टेनिसमध्ये जिम कॉनर्स, बोर्ग, गिल्येर्मो व्हायलस, राऊल रॅमीरेझ, इली नस्तासे असे कित्येक तरुण खेळाडू पुढे आले आहेत.


    1970 च्या सुरुवातीपासून अमेरिकन खेळाडू या खेळात फार मोठ्या संख्येने पुढे येऊ लागलेले आहेत. या खेळातील ऑस्ट्रेलियन वर्चस्वालाही याच काळात ओहोटी लागल्याचे दिसते. कित्येक नामवंत ऑस्ट्रेलियन खेळाडू अमेरिकेत येऊन सतत खेळत असतात. दुसरे म्हणजे या खेळामुळे खेळाडूंना मिळत असलेला अफाट पैसा हे त्याच्या वाढत्या जागतिक आकर्षणाचे प्रमुख कारण आहे. अमेरिकेत निरनिराळ्या ठिकाणी होणाऱ्‍या अनेक स्पर्धांमध्ये बक्षिसाच्या रकमा फार मोठ्या असतात. ‘ग्रां प्री’सारख्या स्पर्धा ठिकठिकाणी होऊ लागल्या आहेत. 20 ग्रां प्री स्पर्धांमध्ये उत्कृष्ट ठरलेल्या पहिल्या 8 खेळाडूंसाठी ‘मास्टर्स’ नामक सुरू झाली आहे. या सर्व स्पर्धा अतिशय लोकप्रिय ठरलेल्या आहेत.


    टेनिसच्या खेळास चापल्य लागते. मागे, पुढे व बाजूला पळून, वाकून किंवा उडी मारूनही चेंडू टोलवावा लागतो. त्यामुळे शरीरास भरपूर व्यायाम होतो. वयाच्या पंधराव्या वर्षी खेळास सुरुवात केल्यास ऐन तारुण्यात चांगला खेळ खेळता येतो. तसेच हा खेळ वयाच्या 60 वर्षांनंतरही खेळता येतो.




    सम्बन्धित प्रश्न



    Comments खेळाचे प्रमुय निय on 28-01-2020

    .

    Nikhil more on 08-12-2019

    Tennisce niyam

    Nikhil on 08-12-2019

    Tennis ya khelace niyam Marathi






    मोहम्मद ग़ोरी धमियक़ तेल उत्पादन अफ्रीका की मूलभूत जनजाति ‘पिग्मी‘ किस नदी में पायी जाती है- वनस्पति और जीव के महत्व सागरीय लवणता का स्त्रोत है - चाय पत्ती का बिजनेस justice delayed is justice denied expansion of idea हाल ही में भारत और फिलीपींस के मध्य चार समझौतों पर हस्ताक्षर किए गए। प्रश्न में किस क्षेत्र में किया गया समझौता इसमें शामिल नहीं है ? सापेक्षिक आर्द्रता के मापन हेतु किस उपकरण का प्रयोग किया जाता है - अंतर्राज्यीय परिषद का पुनर्गठन भारत में सबसे ज्यादा कौन सी मिट्टी पाई जाती है संतूर भारत में सबसे अधिक कॉफी उत्पन्न करने वाला राज्य कौन - सा है - ग्राम पंचायत के कार्य का विवरण विशाखदत्त के प्राचीन भारतीय नाटक सेण्ट्रल सोयल सैलेनिटी रिसर्च इंस्टीट्यूट (CSSRI) हरियाणा के किस जिले में स्थित हैं ? दो तिहाई कितना होता है कृष्णदेव का दरबारी वर्षा की बूँद गोलाकार होती है ? सर्वोच्च न्यायालय में न्यायिक काम काज के लिए किस भाषा का प्रयोग किया जाता है -

    नीचे दिए गए विषय पर सवाल जवाब के लिए टॉपिक के लिंक पर क्लिक करें Culture Question Bank International Relations Security and Defence Social Issues English Antonyms English Language English Related Words English Vocabulary Ethics and Values Geography Geography - india Geography -physical Geography-world River Gk GK in Hindi (Samanya Gyan) Hindi language History History - ancient History - medieval History - modern History-world Age Aptitude- Ratio Aptitude-hindi Aptitude-Number System Aptitude-speed and distance Aptitude-Time and works Area Art and Culture Average Decimal Geometry Interest L.C.M.and H.C.F Mixture Number systems Partnership Percentage Pipe and Tanki Profit and loss Ratio Series Simplification Time and distance Train Trigonometry Volume Work and time Biology Chemistry Science Science and Technology Chattishgarh Delhi Gujarat Haryana Jharkhand Jharkhand GK Madhya Pradesh Maharashtra Rajasthan States Uttar Pradesh Uttarakhand Bihar Computer Knowledge Economy Indian culture Physics Polity

    Labels:
    अपना सवाल पूछेंं या जवाब दें।






    Register to Comment