Shivaji MahaRaj Itihas MaRaathi शिवाजी महाराज इतिहास मराठी

शिवाजी महाराज इतिहास मराठी



Pradeep Chawla on 14-10-2018


शिवाजी शहाजी भोसले

छत्रपती

Shivaji British Museum.jpg

छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे लंडन इथल्या ब्रिटिश संग्रहालयातील अस्सल चित्र

Flag of the Maratha Empire.svg

मराठा साम्राज्य

अधिकारकाळ जून 6, 1674 ते एप्रिल 3, 1680

राज्याभिषेक जून 6, 1674

राज्यव्याप्ती पश्चिम महाराष्ट्र, कोकण,

सह्याद्री डॊंगररांगांपासून नागपूरपर्यंत

आणि

उत्तर महाराष्ट्र, खानदेशापासून

दक्षिण भारतात तंजावरपर्यंत

राजधानी रायगड किल्ला

पूर्ण नाव शिवाजीराजे शहाजीराजे भोसले

जन्म फेब्रुवारी 19, 1630

शिवनेरी किल्ला, पुणे

मृत्यू एप्रिल 3, 1680

रायगड

उत्तराधिकारी छत्रपती संभाजीराजे भोसले

वडील शहाजीराजे भोसले

आई जिजाबाई

पत्नी सईबाई,

सोयराबाई,

पुतळाबाई,

काशीबाई,

सकवारबाई

लक्ष्मीबाई

सगणाबाई

गुणवंतीबाई

राजघराणे भोसले

राजब्रीदवाक्य प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।

चलन होन, शिवराई, (सुवर्ण होन, रुप्य होन??)





छत्रपती शिवाजीराजे भोसले (19 फेब्रुवारी 1630 ते 3 एप्रिल 1680) हे इ.स. 1818 पर्यंत टिकलेल्या आणि आपल्या परमोत्कर्षाच्या अवस्थेत भारतीय उपखंडाचा बराचसा भाग व्यापणाऱ्या मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. जनता त्यांना शिवराय, शिवाजी महाराज किंवा राजे नावाने संबोधते. भोसले कुळातील या सुपुत्राने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध ऐतिहासिक संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले. रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजीने उभे केले आणि इ.स. 1674 मध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक करवून घेतला.



महाराष्ट्रात, छत्रपती शिवाजी हे शिवाजीराजा, शिवाजीराजे, शिवबा, शिवबाराजे, शिव, शिवराय, शिवा अशा अनेक नावांनी ओळखले जातात. शिवाजीचा जन्मदिवस हा ‘शिवजयंती’ म्हणून साजरा होतो. शिवाजी आणि त्यांचा पुत्र संभाजी यांचा संयुक्त उल्लेख शिवशंभू असा होतो. शिवाजीच्या कारकीर्दीला शिवकाल असेही म्हणतात.



शिस्तबद्ध लष्कर व सुघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर शिवाजीने एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. भूगोल, आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले. आपल्या वडिलांकडून मिळालेल्या 2,000 सैनिकांच्या छोट्या तुकडीपासून एक लाख सैनिकांचे लष्कर शिवाजी महाराजांनी उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच अनेक किल्लेही त्यांनी उभारले. राज्यकारभारात मराठी भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले.



अनुक्रमणिका



1 जन्म

1.1 कौटुंंबिक माहिती

1.2 वंशज

2 मार्गदर्शक

2.1 मावळ प्रांत

2.1.1 शिवाजी महाराजांचे मावळामधील सवंगडी आणि अन्य प्रसिद्ध मावळे

3 शिवाजी महाराजांचे सरसेनापती

4 स्वराज्य स्थापनेचा इतिहास

5 पहिली स्वारी - तोरणगडावर विजय

6 राजमुद्रा

7 शहाजीराजांना अटक

8 जावळी प्रकरण

9 पश्चिम घाटावर नियंत्रण

10 आदिलशाहीशी संघर्ष

11 अफझलखान प्रकरण

12 प्रतापगडाची लढाई

13 कोल्हापूरची लढाई

14 सिद्दी जौहरचे आक्रमण

15 पावनखिंडीतील लढाई

16 पुरंदराचा तह

17 मोगल साम्राज्याशी संघर्ष

18 शाहिस्तेखान प्रकरण

19 सुरतेची पहिली लूट

20 मिर्झाराजे जयसिंह प्रकरण

21 आग्य्राहून सुटका

22 सर्वत्र विजयी घोडदौड

23 राज्याभिषेक

24 दक्षिण दिग्विजय

25 शिवाजी जयंती

25.1 इतिहास

25.2 सण

26 शिवाजीमहाराजांविषयी ललितेतर लेखन

27 साहित्यात व कलाकृतींमध्ये

28 शिवाजीची स्तुती करणारे अभारतीय

29 शिवाजीवर टीका करणारे लेखक, राजकारणी आणि पुस्तके

30 पूर्वज

31 संदर्भ

32 बाह्य दुवे



जन्म

शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ, शिवनेरी



पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर इ.स. 1630 मध्ये शिवाजीचा जन्म झाला. इतिहासाच्या अभ्यासकांमध्ये शिवाजीची नेमकी जन्मतारीख हा एकेकाळी मतभेदांचा मुद्दा होता. तो वाद नंतर मिटला. महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 (शुक्रवार. 19 फेब्रुवारी 1630) ही शिवरायांची जन्मतारीख 2001 साली स्वीकारली.[1] त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकार दरवर्षी 19 फेब्रुवारी या दिवशी सुटी जाहीर करते. इतर संभाव्य तारखांमध्ये 6 एप्रिल 1627((वैशाख शुद्ध तृतीया) ही एक जन्मतारीख मानली जात होती. त्यानुसार, महाराष्ट्राबाहेरचे अनेक लोक शिवजयंतीचा दिवस म्हणून वैशाख शुद्ध तृतीया हा दिवस, आणि महाराष्ट्रातले काही लोक मराठी पंचांगाप्रमाणे फाल्गुन वद्य तृतीया हा दिवस शिवजयंती म्हणून पाळतात. त्याप्रमाणे विविध दिनदर्शिकांंमधे वेगवेगळी तारीख दाखविली असते.

एका आख्यायिकेनुसार शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जिजाबाईंनी आपल्याला बलवान पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली होती म्हणून या मुलाचे नाव शिवाजी ठेवले गेले.

कौटुंंबिक माहिती



शहाजीराजे (वडिल)



प्रथम अहमदनगरच्या निजामशहाच्या पदरी एक सरदार म्हणून होते. मलिक अंबर ह्या निजामशहाच्या प्रभावी वजिराच्या मृत्यूनंतर मोगल सम्राट शहाजहानच्या सैन्याने इ.स. 1636 मधे अहमदनगरवर चाल करून ते शहर आपल्या ताब्यात घेतल्यानंतर शहाजीराजे विजापूरच्या आदिलशहाच्या पदरी सरदार म्हणून रूजू झाले. आदिलशहाने त्यांना पुण्याची जहागिरी दिली. शहाजीराजांनी तुकाबाईंशी आपला दुसरा विवाह केला. लहान शिवाजीराजांना घेऊन जिजाबाई पुण्याला रहायला आल्या. तुकाबाई आणि शहाजीराजे ह्यांच्या एकोजी भोसले (व्यंकोजी भोसले) ह्या पुत्रांनी पुढे सध्याच्या तमिळनाडूमधील तंजावरला आपले राज्य स्थापन केले.



जिजाबाई (आई)



जिजाबाई व बाल शिवाजी



जिजाबाई पुण्यात रहायला गेल्या त्यावेळी पुण्याची फार दुरवस्था झालेली होती. तेव्हा छोटे शिवाजीराजे आणि कारभारी ह्यांच्या हस्ते पुण्यात एका शेतात प्रतीकादाखल सोन्याच्या मुलाम्याचा नांगर फिरवून, जिजाबाईंनी दादोजी कोंडदेवांच्या मदतीने पुण्याची पुन:स्थापना करायला सुरुवात केली. शिवाजीराजे लहानाचे मोठे होत असताना आणि मोठे झाल्यावरही (मोठेपणीच्या सिंहगडावरच्या स्वारीसारख्या) प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी त्यांना जिजाबाईंनी खंबीर मार्गदर्शन दिले. शिवाजीमहाराजांच्या त्या आद्यगुरू होत. हिंदवी स्वराज्यस्थापनेचे स्वप्न साकार करायला शिवाजीमहाराजांना जिजाबाईंनी स्फूर्ति दिली असे काही इतिहासकार मानतात.



पत्नी

सईबाई निंबाळकर

सोयराबाई मोहिते

पुतळाबाई पालकर

लक्ष्मीबाई विचारे

काशीबाई जाधव

सगणाबाई शिंदे

गुणवंतीबाई इंगळे

सकवारबाई गायकवाड



वंशज



मुलगे

छत्रपती संभाजी भोसले

छत्रपती राजारामराजे भोसले



मुली

अंबिकाबाई महाडीक

कमळाबाई (सकवारबाईची कन्या)

दीपाबाई

राजकुंवरबाई शिर्के (सगुणाबाईची मुलगी, गणोजी शिर्के यांची पत्नी)

राणूबाई पाटकर

सखुबाई निंबाळकर (सईबाईची मुलगी)



सुना

संभाजीच्या पत्नी येसूबाई

राजारामांच्या पत्नी ताराबाई (माहेरच्या मोहिते)

जानकीबाई

राजसबाई (पुत्र संभाजी - 1698-1760)

अंबिकाबाई (सती गेली)

सगुणाबाई



नातवंडे

संभाजीचा मुलगा - शाहू

ताराबाईची राजारामाची मुले - दुसरा शिवाजी

राजसबाईची मुले - दुसरा संभाजी



पतवंडे

ताराबाईचा नातू रामराजा, याला शाहूने दत्तक घेतले, म्हणजे तो स्वतःचाच काका झाला.

दुसऱ्या संभाजीचा मुलगा - द्वितीय शिवाजी (खरेतर 3रा शिवाजी) (कोल्हापूर)



मार्गदर्शक



लोककथा आणि इतिहास ह्यांमधे कालौघात पुष्कळदा सरमिसळ होते, आणि त्यामुळे इतिहासाचा नेमका मागोवा घेणे कठीण होते. शिवाजीमहाराजांच्या बाबतीत ती सरमिसळ खूपच आहे परिणामी शिवाजीराजांना कोणाचे मार्गदर्शन किती मिळाले हे नक्की ठरवणे निदान आज तरी कठीण आहे. युद्धाभ्यास आणि रणनीती तसेच राजकारभार ह्यांसबंधी प्राथमिक मार्गदर्शन त्यांना शहाजीराजांकडून, दप्तरव्यवस्था व न्यायव्यवस्थेचे शिक्षण दादोजी कोंडदेव मलठणकर यांजकडून, तर परकीय सत्तेविरूद्ध लढा करण्याकरता आवश्यक असलेल्या शिस्तीचे शिक्षण जिजाबाईंकडून मिळाले असे मात्र उपलब्ध ऐतिहासिक माहितीवरून निश्चितपणे सांगता येते.



जिजाबाई यांनी बाल शिवाजीच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांस युद्धकला व राजनीतिशास्त्राचे शिक्षण देवविले शिवाय संत एकनाथ महाराजांच्या भावार्थ रामायण, भारूड इत्यादींच्या माध्यमातून बाल शिवबाच्या मनात स्वराज्याचे स्फुल्लिंग चेतविले. पालक व स्वराज्याच्या प्राथमिक संत तुकाराममहाराज ह्यांचे महत्त्वाचे मार्गदर्शनही शिवाजीराजांना लाभले होते.[2]

मावळ प्रांत



मुख्य पान: मावळ



छत्रपती शिवाजीराजाच्या सैन्यातील मावळ्यांनी शिवाजीराजांच्या सोबत हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात मोठा सहभाग नोंदवला. सह्याद्रीच्या दोन डोंगररांगांच्या मधल्या खोर्‍याला मावळ आणि खोर्‍यातील सैनिकांना मावळे म्हणत.





छत्रपती शिवाजी महाराज27.jpg

शिवाजी महाराजांचे मावळामधील सवंगडी आणि अन्य प्रसिद्ध मावळे



कान्होजी जेधे

बाजीप्रभू देशपांडे

मुरारबाजी देशपांडे

नेताजी पालकर

बाजी पासलकर

जिवा महाला : जिवा महाला याचे छायाचित्र असलेले टपाल तिकीटही निघाले आहे.

तानाजी मालुसरे

हंबीरराव मोहिते



शिवाजी महाराजांचे सरसेनापती



नेताजी पालकर

प्रतापराव गुजर

हंबीरराव मोहिते

खंडेराव कदम



स्वराज्य स्थापनेचा इतिहास

शिवाजी महाराज





Wiki letter w.svg

कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.

अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

पहिली स्वारी - तोरणगडावर विजय



इ.स. 1647 मधे सतरा वर्षांच्या शिवाजीराजांनी आदिलशहाच्या ताब्यातला तोरणगड जिंकला आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. तोरणगड हे स्वराज्याचे तोरणच ठरले. त्याच साली शिवाजीराजांनी कोंढाणा(सिंहगड), आणि पुरंदर हे किल्ले आदिलशहाकडून जिंकून पुणे प्रांतावर पूर्ण नियंत्रण मिळवले.या शिवाय तोरणगडासमोरील मुरुंबदेवाचा डोंगर जिंकून त्याची डागडुजी केली व त्याचे




सम्बन्धित प्रश्न



Comments BHargavi on 08-02-2024

Ikughih

अभिजीत on 22-10-2022

शिवाजी महाराज विषयी माहिती

Anjali on 17-10-2021

Shivaji maharaj ki Pahile ladai and kiske Sath hui


Arbaz khan on 18-02-2021

What was Shivajis last military expedition?

Saurabh nikam on 01-01-2020

शिवाजी महाराज कि राजधानी

Rohit on 04-06-2019

Shivaji maharaj

harish g k on 18-02-2019

who was bajirav deshpande




अक्षय सोनवणे on 15-09-2018

शिवजी महाराज पहला युद्ध कहा और किसके साथ हुआ

torana gada on 28-09-2018

torana gada



नीचे दिए गए विषय पर सवाल जवाब के लिए टॉपिक के लिंक पर क्लिक करें Culture Question Bank International Relations Security and Defence Social Issues English Antonyms English Language English Related Words English Vocabulary Ethics and Values Geography Geography - india Geography -physical Geography-world River Gk GK in Hindi (Samanya Gyan) Hindi language History History - ancient History - medieval History - modern History-world Age Aptitude- Ratio Aptitude-hindi Aptitude-Number System Aptitude-speed and distance Aptitude-Time and works Area Art and Culture Average Decimal Geometry Interest L.C.M.and H.C.F Mixture Number systems Partnership Percentage Pipe and Tanki Profit and loss Ratio Series Simplification Time and distance Train Trigonometry Volume Work and time Biology Chemistry Science Science and Technology Chattishgarh Delhi Gujarat Haryana Jharkhand Jharkhand GK Madhya Pradesh Maharashtra Rajasthan States Uttar Pradesh Uttarakhand Bihar Computer Knowledge Economy Indian culture Physics Polity

Labels: , , , , ,
अपना सवाल पूछेंं या जवाब दें।






Register to Comment