sfdsf सारस पक्षी माहिती मराठी - Saras Pakshi Mahiti MaRaathi -69954

Saras Pakshi Mahiti MaRaathi सारस पक्षी माहिती मराठी

सारस पक्षी माहिती मराठी



GkExams on 19-04-2022


सारस पक्षी माहिती मराठी (crane bird in marathi) : सारस हा एक उंच पक्षी आहे. नर सारस सुमारे 4.5 ते 5 फुटांचा तर मादी 3.5 फुटांपर्यंत असते. सारस पक्षी नेहमी जोडीनेच राहातात. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एक सारस असल्याची नोंद आहे.


Crane Bird Images :


Saras-Pakshi-Mahiti-MaRaathi


सारस पक्षी हा धान्य, किडे खाऊन जगतो. त्यातही किडे, अळ्या खाण्यावर भर असतो. त्यामुळे त्याला शेतातला 'नॅचरल पेस्ट कंट्रोलर' असं म्हटलं जातं. सारस शेतामध्ये असणं शेत उत्तम स्थितीत असल्याचा संकेत मानला जातो.


सारस पक्षी (crane bird in india) महाराष्ट्रातून पूर्ण नामशेष होतील अशी स्थिती निर्माण झाली होती. परंतु एकत्रित प्रयत्नांमुळे ही स्थिती बदलण्यात गोंदियाच्या लोकांना यश आलं. सारसचा अधिवास असणाऱ्या गोंदिया, भंडारा, बालाघाट या प्रदेशाला 'सारसस्केप' असं नाव देण्यात आलं.


सारस पक्षी आपलं घरटं एखाद्या पाणथळ जागेजवळ किंवा भरपूर पाण साचत असलेल्या शेतामध्ये तयार करतो. या घरट्याचा पसारा साधारणतः 10 फुटांपर्यंत असू शकतो.


आजूबाजूचं गवत वापरून जमिनीवरच हे घरटं तयार होतं. सारस पक्ष्याची जोडी वर्षभरात एकदाच तेही मॉन्सूनच्या काळामध्ये घरटं बांधते. एका वर्षात केवळ एक किंवा दोनच अंडी ही जोडी देते.


जर शेतामधली किंवा पाणथळ जागांजवळची परिस्थिती सुरक्षित वाटली नाही तर सारस पक्ष्याची जोडी घरटंच बांधत नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी सुरक्षित वाटेल अशी स्थिती तयार करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असते.


गोंदिया जिल्ह्यात ज्या शेतांमध्ये ही घरटी बांधली जातात, अशा शेतांच्या जागा शोधून काढल्या गेल्या.


संबंधित शेतकऱ्यांशी बोलून त्यांच्याशी चर्चा करून सारसच्या घटत्या संख्येबद्दल त्यांना माहिती देण्यात आली. सारस पक्ष्याला कीटकनाशकांच्या वापरामुळे धोका निर्माण होतो. हा धोका कमी करण्यासाठी रासायनिक किटकनाशकांचा वापर कमी करण्याचं आवाहन करण्यात आलं.


सारस पक्ष्याला (crane bird meaning) असं संरक्षण देण्यामुळं आज या सारसस्केपमधली सारसची संख्या वाढली आहे.


जून महिन्यामध्ये सारस पक्ष्यांची संख्या मोजण्यासाठी बालाघाट जिल्ह्यात 20 तर गोंदिया-भंडारा जिल्ह्यांमध्ये 22 चमू तयार केले गेले. या लोकांनी पाणथळ जागा, नद्या शेतांमध्ये, तलावांजवळ जाऊन पाहाणी करून ही संख्या मोजण्यात आली.


या मोजणीमध्ये गोंदिया जिल्ह्यात 40 ते 42 सारस, बालाघाटमध्ये 52 ते 54, भंडारा जिल्ह्यात 3 आणि चंद्रपूरमध्ये 1 सारस पक्षी आढळला.


Source : BBC




सम्बन्धित प्रश्न



Comments purvi bhashkar borkar on 09-11-2022

Sarash pakshi mahiti

Many on 20-08-2022

Sars paksyache sarksahn v savrdahn nibahnd saval

shivam Patankar on 09-08-2022

Saaras pakshi sanvardhan samajachi bhumika


वर्षा on 05-10-2020

रामायणातील कथा सारस पक्षाची

saras pakshi chi mahiti on 18-12-2019

saras pakshi mahiti

Satyam pandey on 11-12-2019

Who ii the bard eat a stons



Satyam pandey on 11-12-2019

Who ii the bard eat a stons




नीचे दिए गए विषय पर सवाल जवाब के लिए टॉपिक के लिंक पर क्लिक करें Culture Question Bank International Relations Security and Defence Social Issues English Antonyms English Language English Related Words English Vocabulary Ethics and Values Geography Geography - india Geography -physical Geography-world River Gk GK in Hindi (Samanya Gyan) Hindi language History History - ancient History - medieval History - modern History-world Age Aptitude- Ratio Aptitude-hindi Aptitude-Number System Aptitude-speed and distance Aptitude-Time and works Area Art and Culture Average Decimal Geometry Interest L.C.M.and H.C.F Mixture Number systems Partnership Percentage Pipe and Tanki Profit and loss Ratio Series Simplification Time and distance Train Trigonometry Volume Work and time Biology Chemistry Science Science and Technology Chattishgarh Delhi Gujarat Haryana Jharkhand Jharkhand GK Madhya Pradesh Maharashtra Rajasthan States Uttar Pradesh Uttarakhand Bihar Computer Knowledge Economy Indian culture Physics Polity

Labels: , सारस , , , , ,
अपना सवाल पूछेंं या जवाब दें।






Register to Comment