Arthshasatra MaRaathi Vyakhaya अर्थशास्त्र मराठी व्याख्या

अर्थशास्त्र मराठी व्याख्या

Pradeep Chawla on 10-10-2018

अर्थशास्त्र एक सामाजिक शास्त्र असून ते 'सेवा व उत्पादनांच्या' निर्मिती, वितरण आणि वापर या विषयाची माहिती देते. इंग्रजीत अर्थशास्त्राला 'इकॉनॉमिक्स' (Economics) म्हणतात, व अर्थशास्त्राच्या विद्वान अभ्यासकांना अर्थशास्त्रज्ञ किंवा अर्थतज्ज्ञ असे म्हणतात. हे शास्त्र राष्ट्राच्या संपत्तीचाही अभ्यास करते.


चाणक्य यांनी इसवी सनापूर्वीच्या तिसऱ्या शतकात अर्थशास्त्रावर 'अर्थशास्त्र' हा ग्रंथ लिहिला. ॲडम स्मिथ यांना ’आधुनिक अर्थशास्त्राचे जनक समजले जाते. त्यांनी ‘राष्ट्राची संपत्ती’ हा ग्रंथ 1776मध्ये लिहिला. त्या ग्रंथाला अर्थशास्त्राचे बायबल समजले जाते.


अर्वाचीन अर्थशास्त्राची सुरुवात ॲडम स्मिथ यांच्या इ.स. 1776 मधील वेल्थ ऑफ नेशन्स पासून झाली. अर्थशास्त्राचे अनेक विभाग/प्रकार विविध निकषांनुसार पाडले गेले आहेत. उदा. समग्रलक्षी (Macro) व अल्पलक्षी (Micro). समग्रलक्षी अर्थशास्त्र देश-राज्य इत्यादी मोठ्या संस्थांचे मोठे आर्थिक प्रश्न व आर्थिक व्यवहार या व अश्या अनेक बाबीची चर्चा करते तर अल्पलक्षी अर्थशास्त्र एखादा माणूस, एखादे कुटुंब किंवा एखादी आर्थिक संस्था इत्यादींच्या व्यवहारसंबंधी प्रश्नांबाबत माहिती देते. अर्थशास्त्र हे कल्याणकारी शास्त्र आहे अर्थिक कल्याण याचा पैशाच्या संदर्भातील मोजमापांशी संबध असतो


सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास ॲडम स्मिथ यांच्यापासून झाला अर्थशास्त्राच्या अभ्यास विषयात अनेक घटकचा अभ्यास केला जातो कल्याणाबाबत कसोट्या तयार करणे व अर्थिक धोरणास मदत करणे हे विश्केषणात्मक काम करणार्‍या अथशास्त्राच्या शाखेस कल्याणकारी अर्थशास्त्र म्हणतात. कल्याणकारी शास्त्राची सुरुवात पिंगूनावाच्या अर्थतज्ज्ञाने केली. कल्याण हा शब्द पिंगूनेच मांडला. पिंगूच्या मते राष्ट्रीय उत्पन्न हे अर्थिक कल्याणाचे निर्देशक असते..


सूक्ष्मलक्षी व समग्रलक्षी या संज्ञाचा वापर सर्वात पहिल्यात रॉग्लर फ्रिश यांनी 1933 साली केला.



Advertisements


Advertisements


Comments Sakshi on 04-09-2023

Paisa ispat ka mujhe pura Arth chahie Marathi

Ganesh kinnake on 04-10-2018

राष्ट्रीय उत्पादनाचा अथ सागुन राष्ट्रीय उत्पन मापनाचा विविध पद्धती सागुन अहवाल सागा

Kiran Prakash gond on 06-09-2018

अर्थशास्त्र का मतलब क्या हैं

Advertisements


Advertisements