आयात निर्यात व्यापार मराठी
भारतीय बाजारपेठ आजसुद्धा अनेक वस्तू आणि सेवा आयात-निर्यातमध्ये अग्रेसर आहे. आज आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय मालाला, वस्तूंना मागणी खूप वाढली आहे. ज्या देशाची निर्यात चांगली तशी त्या देशाची चलनव्यवस्था आणि आर्थिक व्यवस्था मजबूत, असते. आयात-निर्यातीमुळे विदेशी चलन वाढून अर्थव्यवस्था मजबूत कणखर होण्यास मदत होते. तसेच निर्यातीचा मोठ्ठा परिणाम देशाच्या GDP वरसुद्धा होत असतो. म्हणून विदेश व्यापार करणार्यान व्यक्ती तसेच कंपन्यांना भारत सरकारही आवश्यक सोयीसुविधा देण्यासाठी अनेक उपक्रम राबवत आहे. आज भारतीय बाजारपरपेठ अनेक वस्तू आणि सेवा निर्यात आणि IT सेवा निर्यात पुरवण्यात अग्रेसर आहे.
विदेश व्यापाराला आजच्या काळात पूर्वीपेक्षाही काकणभर जास्त महत्त्व आहे. भारतात खुली अर्थव्यवस्था आल्यामुळे आयात निर्यात या दोन्ही गोष्टींमध्ये वाढ झालीय याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. विदेश व्यापार करणाऱ्या व्यक्ती तसेच कंपन्यांना भारत सरकारही आवश्यक सोयीसुविधा देण्यासाठी प्रयत्नशील आहे. भारतीय व्यापारासाठी ही एक सुवर्णसंधी आहे.आयात म्हणजे नक्की काय?सीमा शुल्क अधिनियम 1962 अनुसार भारताबाहेरील काहीही वस्तू भारतात आणणे म्हणजे आयात होय. परंतु घरगुती वापराच्या गोष्टी आपल्याकडे आणणे म्हणजे आयात या संकल्पनेत मोडत नाही हे आपण लक्षात ठेवायला हवे. आयात ही मूळत: व्यापारातील संकल्पना आहे. व्यापारी दृष्टीकोनातून बाहेरील वस्तू आपल्याकडे मागवणे म्हणजे आयात करणे होय.निर्यात म्हणजे काय?ज्याप्रमाणे आयात ही संकल्पना व्यापाराशी संबंधीत आहे तशीच निर्यातसुद्धा आहे. निर्यात म्हणजे आपल्याकडील वस्तू भारताबाहेर व्यापारी उद्देशाने पाठवणे.WhatsApp द्वारे ‘स्मार्ट उद्योजक’ वर्षभर मिळवा फक्त रु. 60 मध्ये : http://imojo.in/2eucndआयात करताना काय लक्षात ठेवाल?आपल्या औद्योगिक गरज भागवण्यासाठी किंवा गुणवत्ता वाढवण्यासाठी अथवा वस्तू खरेदी करण्यासाठी आपण आयात करतो. आपण इतर देशाच्या आयात केलेल्या मालासाठी आपली बाजारपेठही उपलब्ध करून देतो. ज्यामुळे अनेक वेळा आपल्याकडील राहणीमानाचा स्तर उंचावण्यासाठी या गोष्टी साहाय्यक ठरतात. त्यामुळे आपण ज्या देशाकडून आयात करतो त्य देशाचे व आपल्या देशाचे कायदे व नियम यांचा काटेकोर अभ्यास करून त्यांचे पालन होणे गरजेचे असते.आयात करण्यापूर्वी काय काळजी घ्याल?बाजार सर्वेक्षण : एखादी गोष्ट आयात करण्यापूर्वी आपल्याकडे उपलब्ध बाजारपेठेचा अभ्यास व सर्वेक्षण करावे. ज्यामुळे आपल्याकडे कोणत्या प्रकारच्या वस्तूंना मागणी आहे, भविष्यात कोणत्या गोष्टींची मागणी वाढू शकते अशा अनेक शक्याशक्यता आपल्याला कळतात.कायदे आणि नियम : आयातविषयक व्यवसायाचा विचार करताना आपल्याकडील व्यापारनीती, नियम, आतंरराष्ट्रीय कायदे, आपले तसेच ज्या देशांशी आपण व्यवहार करणार त्यांचे व्यापारी धोरण अशा सर्व गोष्टींचा अभ्यास करून मगच पुढचे पाऊल उचलावे.नोंदणी : हा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी आपल्याला DGFT (Director General of Foreign Trade) यांच्याकडे नोंदणी किंवा निर्यात कोड IEE मिळवणे आवश्यक आहे. हा कोड दहा डीजिटचा नंबर असतो. DGFT द्वारे भारतीय कंपनींना तो दिला जातो. भारतातून आयता किंवा निर्यात करण्यासाठी हा कोड असणे अनिवार्य आहे.आयात करताना आपण जिथून माल आयात करतो त्याची पूर्ण माहिती आपल्याकडे असणे आवश्यक असते. एखादी वस्तू आयात करण्यापूर्वी त्या त्या देशातील भारतीय अर्थविषयक काम करणाऱ्या लोकांकडून त्याच्याविषयी खात्री करून घेणे आवश्यक असते. भारत आणि परदेशात आयोजित करण्यात येणाऱ्या विविध प्रदर्शनांमधूनही आपल्याला अशा गोष्टींची माहिती मिळू शकते. त्याचसोबत DGFT द्वारा आयातसंबंधीत सतत येणाऱ्या वेगवेगळ्या सूचनांची आपण माहिती ठेवली पाहिजेत. ISO कडूनही वेळोवेळी माहिती प्रसारित होत असते त्याचीही माहिती सतत ठेवली पाहिजेत.आयात कोण-कोणत्या प्रकारची असते?मोफत आयात : अधिकतर माल किंवा वस्तू या श्रेणीत येतात. यासाठी आयात लायसेन्सची गरज नसते.लायसेंस वस्तू: अशा अनेक वस्तू आहेत ज्यासाठी तुमच्याकडे आयात करण्यासाठी लायसेन्स असणे आवश्यक असते. अशामध्ये काही गरजेच्या वस्तू, मौल्यवान दगड, सुरक्षेविषयक उत्पादन, बी-बियाणे, झाडे, पशू, कीटकनाशके, औषधे, रसायने, काही इलेक्ट्रोनिक वस्तू अशाप्रकारच्या गोष्टी यात मोडतात. यासाठीचे आवश्यक लायसेंस हे DGFT कडूनच मिळते.काही गोष्टी केवळ राज्य व्यापार निगम म्हणजेच (STC) सारखे माध्यम किंवा सरकारी एजंसीद्वारेच आयात केल्या जातात. तर काही गोष्टी या पूर्णत: प्रतिबंधित आहेत. ज्याची आयात करणे कायद्याने गुन्हा ठरतो.‘स्मार्ट उद्योजक’चे सर्व अंक (एकूण 34 अंक) डाउनलोड करा फक्त रु. 300 मध्ये : http://imojo.in/ei26fdनिर्यातविषयक थोडे :एखादी वस्तू. सामान इतर कोणत्याही देशात विकण्यासाठी पाठवले जावू शकते. अशा वस्तूसाठी योग्य ते मूल्य देवून त्याची देवाणघेवाण रस्ता, समुद्र किंवा हवाई मार्गाने भारताबाहेर घेऊन जाणे म्हणजे निर्यात करणे.आपल्याकडील एखादे उत्पादन निर्यात करून आपल्याकडील व्यापार वाढवण्याचे हे एक चांगले माध्यम आहे. निर्यातीचे पहिले प्रयोजन विदेशी चलन आपल्याकडे आणणे हे असते. कारण हे केवळ निर्यात करणाऱ्यासाठीच नव्हे तर देशाच्या अर्थव्यवस्थेसाठीही लाभदायक असते. निर्यातदाराला आंतरराष्ट्रीय व्यापार अधिक सक्षम करतो.भारत सरकारही निर्यातीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवून निर्यात वाढवण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे.निर्यात करण्यापूर्वी काय काळजी घ्याल?बाजार सर्वेक्षण : आपण ज्या देशात आपले उत्पादन निर्यात करणार त्या बाजाराचा अभ्यास आवश्यक असतो. एका निर्यातदाराला आताचे प्रतिस्पर्धी आणि भविष्यातील शक्यतांचा अभ्यासही करणे गरजेचे असते. याचा व्यवस्थित विचार व अभ्यास करणे आवश्यक ठरते.कायदे आणि नियम : निर्यातविषयक व्यवसायाचा विचार करताना आपण ज्या ठिकाणी निर्यात करणार त्या देशाचे व्यापार विेषयक नियम, कायदे तसेच आंतरराष्ट्रीय धोरण याचा अभ्यास केलेला असावा. आपल्याकडील व्यापारनिती, नियम आपले आतंरराष्ट्रीय कायदे अशा व्यापारी धोरण अशा सर्व गोष्टींचा अभ्यास करून मगच पुढचे पाऊल उचलावे. निर्यातदाराला नॉन टैरिफ मेजर्स (NTM) ची माहिती असणे आवश्यक असते. हे सर्वसामान्य करांपेक्षा वेगळे असतात.नोंदणी : हा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी आपल्याला DGFT (Director General of Foreign Trade) मध्ये नोंदणी किंवा निर्यात कोड IEE मिळवणे आवश्यक आहे. हा कोड दहा डिजिटचा नंबर असतो. DGFT द्वारे भारतीय कंपनींना तो दिला जातो. भारतातून आयता किंवा निर्यात करण्यासाठी हा कोड असणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर विदेश व्यापार मंत्रालयाकडून दिला जाणारा BIN हा व्यापार ओळख खातेसुद्धा असणे आवश्यक असते.त्याचबरोबर आपण ज्या देशात आपला माल निर्यात करतो त्या देशाद्वारे निर्धारित केलेल्या गुणवत्ता आणि नियमांविषयी आपण जागरूक असणे आवश्यक आहे. आपला माल त्यांच्या गुणवत्तेच्या कसोटीवर उतरला पाहिजे. विविध योजनाद्वारे भारत सरकार सतत निर्यातदारांसाठी मदत करत असते. अशा अनेक गोष्टींना आपल्या व्यावसायिक प्रगतीच्यादृष्टीने आपण सतत अंगीकारून पुढे जायला हवे.
सविस्तर वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा : https://wp.me/p4g3S9-1C
आयात व्यापार महणजे काय ?
Alikadachya kalatil bhartatun chin v japan ya deshanna niryat honarya v ya deshatun bhartat aayat honarya vastunchi yadi tayar kara
शेती क्षेत्रात आपण कुठून काय आयात आणि कुठून काय निर्यात करू शकतो......
Give me some more answers
भारतातून नियात होणारे वस्तु
आयात व्यापार प्रक्रिया
आयात व्यापाराचा अर्थ काय?
भारतात कोणत्या वस्तू निर्यात व आयात होतात?
आप यहाँ पर gk, question answers, general knowledge, सामान्य ज्ञान, questions in hindi, notes in hindi, pdf in hindi आदि विषय पर अपने जवाब दे सकते हैं।
नीचे दिए गए विषय पर सवाल जवाब के लिए टॉपिक के लिंक पर क्लिक करें
Culture
Current affairs
International Relations
Security and Defence
Social Issues
English Antonyms
English Language
English Related Words
English Vocabulary
Ethics and Values
Geography
Geography - india
Geography -physical
Geography-world
River
Gk
GK in Hindi (Samanya Gyan)
Hindi language
History
History - ancient
History - medieval
History - modern
History-world
Age
Aptitude- Ratio
Aptitude-hindi
Aptitude-Number System
Aptitude-speed and distance
Aptitude-Time and works
Area
Art and Culture
Average
Decimal
Geometry
Interest
L.C.M.and H.C.F
Mixture
Number systems
Partnership
Percentage
Pipe and Tanki
Profit and loss
Ratio
Series
Simplification
Time and distance
Train
Trigonometry
Volume
Work and time
Biology
Chemistry
Science
Science and Technology
Chattishgarh
Delhi
Gujarat
Haryana
Jharkhand
Jharkhand GK
Madhya Pradesh
Maharashtra
Rajasthan
States
Uttar Pradesh
Uttarakhand
Bihar
Computer Knowledge
Economy
Indian culture
Physics
Polity
इस टॉपिक पर कोई भी जवाब प्राप्त नहीं हुए हैं क्योंकि यह हाल ही में जोड़ा गया है। आप इस पर कमेन्ट कर चर्चा की शुरुआत कर सकते हैं।