वन्य जीवन का महत्व in marathi
गेल्या काही वर्षांत वन्य जीव आणि मानव यांच्यातील वाढत्या संघर्षाचे, त्यातून वन्यजीवांकडून माणसावर होणारे वाढते हल्ले, त्याविरोधात होणाऱया मानवी उपाययोजना वन्य जीवांच्या जीवावर बेतणे याबाबत एक विदारक चित्र समोर येऊ लागले आहे. या संघर्षाची तीव्रता कमी करायची असेल तर मुख्यत्वे विकास साधताना वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासाचासुद्धा गंभीरपणे विचार करावा लागेल. वन्य जीवांचे मृत्यू अथवा त्यांच्यावर होणारे हल्ले अनैसर्गिक असले तरी त्यामागची कारणे नैसर्गिक आहेत, कारण मानव आणि वन्य जीव दोघांकरिता हा संघर्ष जगण्याचा आहे, जिंकण्याचा नव्हे!
देशभरात आज 50 अतिसंरक्षित व्याघ्र प्रकल्प अस्तित्वात आहेत. तरी वन्य प्राणी आणि मनुष्यातील संघर्ष वेळीअवेळी उफाळून येतो. मध्य प्रदेशातील शाहडोल येथे 2018च्या सुरुवातीलाच विद्युत प्रवाह असलेल्या तारेच्या स्पर्शाने तर कर्नाटक बंदीपूर येथे दोन वाघ आणि एका हत्तीचा विषप्रयोगाने झालेला मृत्यू वन्यजीवप्रेमींना चटका लावून गेला. 1972-73 साली सुरू झालेल्या व्याघ्र प्रकल्पांचा उद्देश केवळ वाघाचे संवर्धन इतकाच मर्यादित नव्हता. किंबहुना त्याला वाघाचे नाव देऊन वन्यजीवांचे नैसर्गिक संरक्षण व्हावे या हेतूने व्याघ्र प्रकल्पांची निर्मिती सुरू झाली आणि हिंदुस्थानातील पहिला व्याघ्र प्रकल्प जिम कॉर्बेट यांच्या नावे सुरू झाला.
वाघाच्या माध्यमातून जैवविविधतेचे आणि निसर्गाचे संवर्धन व्हावे हा व्यापक हेतू त्यामागे दडला आहे. काझीरंगा येथे व्याघ्र प्रकल्पाच्या माध्यमातून गेंडय़ाचे, कर्नाटकला बंदीपूर व्याघ्र प्रकल्पात हत्तींचे, सुंदरबन येथे खाऱया पाण्यातील मगरी असो अथवा एकेकाळी मेळघाटमधील सर्वात जास्त संख्या असलेले गौर (बायसन) असो, या सर्व लोप पावत चाललेल्या वन्यजीवांना संजीवनी व्याघ्र प्रकल्पांनी मिळवून दिली. व्याघ्र प्रकल्पांची सुरुवात होऊन संवर्धनात लक्षणीय यश देखील प्राप्त होऊ लागले. मात्र आता वन्यजीवांच्या आणि नागरिकांच्या समोर नवीन मोठे आव्हान उभे राहिले आहे. विशेषतः गेल्या काही वर्षांत याबाबतीत विदारक चित्र समोर येऊ लागले आहे. त्यातून सृष्टीतील या दोन जिवांचा आपसातला संघर्ष भविष्यातील मोठय़ा नैसर्गिक आपत्तीची चाहूल देत आहे. यातून वेळीच बोध घेतला गेला नाही तर येणाऱया काळात उद्भवणाऱया परिस्थितीवर कुणाचेच नियंत्रण राहणार नाही.
रोजच्या घटना बघता वन्य प्राण्यांचे होणारे मृत्यू आणि नागरिकांचा संघर्ष हा सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकविणारा आहे. कधी अपघातात, कधी शिकार, कधी विद्युत तारेच्या स्पर्शाने तर कधी मानवी वस्तीत प्रवेश केल्याने झालेली जीवितहानी येणाऱया काळातील भयावह परिस्थितीचा अंदाज देण्यास पुरेशी आहे. भूतकाळातील आकडे बघता हा विषय गंभीर वळणावर उभा आहे.
हिंदुस्थानचा विचार केल्यास वन्य जीवांच्या हल्ल्यात ठार झालेले 2017 साली प्रकाशित केंद्र सरकारचे आकडे नागरिक आणि वन्यजीवांच्या आपसातील संघर्षाचे विदारक चित्र उभे करणारे आहे. एप्रिल 2014 ते मे 2017 या तीन वर्षांत केवळ वाघ आणि हत्तीच्या हल्ल्यात सरासरी रोज एक नागरिक या प्रमाणे 1144 नागरिक मारले गेले आहेत. (जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार डास हा सर्वात जास्त मानवाच्या मृत्यूला कारणीभूत आहे. दर वर्षी 7 लाख 25 हजार लोकांचा त्याच्या प्रादुर्भावाने मृत्यू होतो हे दुर्लक्षित पण वास्तव आहे.)
वन्यजीवांचे विविध प्रकार असल्याने एकूण मृत वन्यजीवांचे निश्चित आकडे मिळणे कठीण आहेत, पण वन्यजीवातील वाघांचे महत्त्व आणि माध्यमांचे वाघाभोवतालचे वलय बघता आकडेवारी उपलब्ध आहे. बाकी हत्ती, बिबटे यांसारख्या वन्य जीवांची आकडेवारी स्थानिक पातळीवर उपलब्ध असते. हत्तींच्या हल्ल्यात सर्वात जास्त जीवितहानी होत आली आहे, तर दर वर्षाला किमान 80 हत्ती मनुष्याकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मारले जात असल्याचे अभ्यासकांचे संशोधन आहे.
2009-10 ते 2017 या दरम्यान 700 हून अधिक हत्ती मारले गेले आहेत. 2017च्या हत्तींच्या संख्यामोजणीनुसार सध्या हत्तींची संख्या 27,312 आढळून आली आहे, पण गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत हत्तींच्या संख्येत 10 टक्के घट झाल्याचे दिसून आले आहे. 2012 साली 30 हजारांच्या आसपास हत्तींची संख्या होती.
2010 ते 2017 चा विचार केल्यास मृत झालेल्या 700 हत्तींपैकी 44 विषप्रयोगाने, 100 च्या वर शिकारीने, 120 रेल्वे अपघातात तर 400 हून अधिक विद्युतप्रवाहाने मरण पावले आहेत. आशियातील हत्तींच्या एकूण संख्येपैकी सुमारे 60 टक्के हत्तींचे हिंदुस्थानात वास्तव्य आहे. हत्तींच्या संरक्षित क्षेत्रासाठी अंदाजे 65 हजार चौरस कि.मी. क्षेत्र राखीव आहे. वरील हत्तींची संख्या आणि मृत होण्याचे प्रमाण बघता दर महिन्याला सात हत्ती मृत होत आहेत असे सरासरी चित्र आहे.
वाघांचा विचार केल्यास 2014 साली 78, 2015 साली 80, 2016 साली 120 तर 2017 साली 115 वाघ मृत झाले आहेत. मृत वाघांचा आकडा बघितल्यास मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आसाम या तीन राज्यांत एकूण मृत झालेल्या वाघांपैकी 55 टक्के वाघ या तीन राज्यांत मृत झाले आहेत. सरासरी काढल्यास दर महिन्याला 9 वाघ मृत झाले असल्याचा निष्कर्ष निघतो व 2014-15 चा विचार केल्यास वाघाच्या मृत्यू संख्येत 2016-17 सालात जवळपास 50 टक्के वाढ झाल्याचे दिसते. यातील बहुतांशी वाघ हे संरक्षित क्षेत्राचे बाहेर मारले गेले आहेत. हत्ती आणि वाघांची मृत होण्याच्या कारणात समानता प्रकर्षाने दिसते.
वन्यजीवांच्या मृत्यूला कारणीभूत सर्वात मुख्य कारण हे वन्यजीवांचा नैसर्गिक अधिवास आणि होऊ घातलेला विकास यातील असमतोल त्यातूनच नवीन अधिवासाच्या शोधात असताना मानव आणि वन्यजीवांचा संघर्ष होऊन जीवितहानी होते. कधीकाळी विकास कसा असावा हा संशोधनाचा विषय होता. आता विकास कसा नसावा याचे संशोधन करण्याची वेळ आली आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.
वन्यजीव संवर्धनाच्या कार्यात सक्रिय असलेल्या वाईल्ड लाइफ ट्रस्ट ऑफ इंडिया या संस्थेचे सदस्य आणि नागपूर येथील वन्यजीवप्रेमी प्रफुल्ल भांबुरकर यांनी यासंदर्भात काही मौलिक सूचना केल्या आहेत. त्यानुसार या सर्व संघर्षाची तीव्रता कमी करायची असेल तर मुख्यत्वे विकास साधताना वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासाचासुद्धा गंभीरपणे विचार करावा लागेल. शेतकऱयांना पिकांच्या संरक्षणासाठी सौरऊर्जेवर चालणारी विद्युत उपकरणे उपलब्ध करून द्यावी लागतील, अथवा जमिनीखालून विद्युत प्रवाह अथवा विशिष्ट केबलचा वापर करून वन्यजीव व मनुष्यांची धक्कादायक जीवितहानी आटोक्यात आणता येऊ शकेल. वन्यजीवांचे मृत्यू अथवा त्यांच्यावर होणारे हल्ले अनैसर्गिक असले तरी त्यामागची कारणे नैसर्गिक आहेत, कारण मानव आणि वन्यजीव दोघांकरिता हा संघर्ष जगण्याचा आहे, जिंकण्याचा नव्हे!
I don know
Log marte ku hai
Nibahdha kaise likhate he
Vanya paranyncha mahatva
Vanyjiv ani itar pranyache honare sthalanter evs project
Yanjiv niskarsh
दहा वन्य जीवन चे उद्दिष्टे आनी निरीक्षण
दहा वन्य जीवन चे उद्दिष्टे आनी निरीक्षण सांगा
?
Vanya jiv ani tyanche mahatv nibandh
Nice
Go savrdanachy manvi jivnatili mahtv
Vanya jiv sanghrsh nirikshan,sankhikikaran,nishkarsh,mahtv sanga in Marathi
आप यहाँ पर gk, question answers, general knowledge, सामान्य ज्ञान, questions in hindi, notes in hindi, pdf in hindi आदि विषय पर अपने जवाब दे सकते हैं।
नीचे दिए गए विषय पर सवाल जवाब के लिए टॉपिक के लिंक पर क्लिक करें
Culture
Current affairs
International Relations
Security and Defence
Social Issues
English Antonyms
English Language
English Related Words
English Vocabulary
Ethics and Values
Geography
Geography - india
Geography -physical
Geography-world
River
Gk
GK in Hindi (Samanya Gyan)
Hindi language
History
History - ancient
History - medieval
History - modern
History-world
Age
Aptitude- Ratio
Aptitude-hindi
Aptitude-Number System
Aptitude-speed and distance
Aptitude-Time and works
Area
Art and Culture
Average
Decimal
Geometry
Interest
L.C.M.and H.C.F
Mixture
Number systems
Partnership
Percentage
Pipe and Tanki
Profit and loss
Ratio
Series
Simplification
Time and distance
Train
Trigonometry
Volume
Work and time
Biology
Chemistry
Science
Science and Technology
Chattishgarh
Delhi
Gujarat
Haryana
Jharkhand
Jharkhand GK
Madhya Pradesh
Maharashtra
Rajasthan
States
Uttar Pradesh
Uttarakhand
Bihar
Computer Knowledge
Economy
Indian culture
Physics
Polity
इस टॉपिक पर कोई भी जवाब प्राप्त नहीं हुए हैं क्योंकि यह हाल ही में जोड़ा गया है। आप इस पर कमेन्ट कर चर्चा की शुरुआत कर सकते हैं।